स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
आज दिनांक २८/०५/२०१९ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म दिवस आज आपण स्वात्यंत्रवीरांनी मिळवून दिलेल्या या भारत देशात राहत आहोत. स्वात्यंत्रवीर यांनी आपलं तारुण्य कालापाण्याच्या शिक्षेत घालवलं . देशासाठी आपलं आयुष्य पणाला लावणाऱ्या स्वतंत्रवीरांची आज जयंती आहे . या निमित्ताने त्यांच्या आयुष्यातील एक प्रेरणादायी काठ सादर करत आहोत.
सावरकर हे बेरिस्टर पदवी प्राप्त केलेले होते हे आपण सर्वानाच माहित आहे . शिक्षणसाठी ते इंग्लंड देशाला गेले होते. आणि तेथेच वास्तवात ही होते त्यांनी इंग्लंड मध्ये राहून भारतीय स्वातंत्र्य चळवळींना पाठिंबा केल्या प्रकरणी त्यांना देश सोडून न जाण्याची शिक्षा सुनावनाय्त आली होती . आशयात त्यांना एक पत्र येत भारतातून ते पुढील प्रमाणे
प्रिय विनायक ,
खूप खूप आशीर्वाद ! तुम्ही स्वातंत्र्यासाठी जे परिश्रम करत आहेत ते खूप अवघड आणि खडतर आहे.
तुमची पत्नी आणि आम्ही आपल्या सर्व कुटुंब सावंत नाशिकच्या राम मंदिर जवळ राहत आहोत .
आपल्या मोठया बंधु अटक करण्यात अली आहे
आम्ही राम मंदिरात मिळणाऱ्या शिध्यावर आपले आयुष्य भागवत आहोत . परंतु पत्राचे कारण हे नाही
आपल्याला हे कळवण्यासाठी पत्र कि आपल्या मुलाचे नेमोनिया मुले निधन झाली आहे आणि त्याच्या
पार्थिवाला खांदा देण्यासाठी आपल्या घरात एक हे व्यक्ती नाही आपणास विनंती आहे कि आपण लवकरात
लवकर यावे हीच अपेक्षा ...!
कळावे ,
आपली वाहिनी .
त्या पत्राचं उत्तर म्हणून सावरकर लिहितात
आदरणीय वाहिनी,
स.न.वि.वि. ,
आपले पात्र मिळाले ते वाचून फार दुःख झाले .
आपणास काय बोलावे हेच उमजत नाही आहे .
आपणासाठी हे कविता लिहितो
ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला ॥धृ॥
भूमातेच्या चरणतला तुज धूता मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशि चल जाऊ सृष्टिची विविधता पाहू
तैं जननीहृद् विरहशंकितहि झाले परि तुवां वचन तिज दिधले
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी मी जगद्नुभवयोगे बनुनी मी
तव अधिक शक्ती उद्धरणी मी येईन त्वरे कथुनि सोडिले तिजला ॥
सागरा प्राण तळमळला
शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशी ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहु या पुढती दशदिशा तमोमय होती
गुणसुमने मी वेचियली या भावे की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता रे नवकुसुमयुता त्या सुलता रे
तो बाल गुलाबहि आता रे फुलबाग मला हाय पारखा झाला ॥
सागरा प्राण तळमळला
नभि नक्षत्रे बहुत एक परि प्यारा मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य मज प्रिया साचा वनवास तिच्या जरि वनिचा
भुलविणे व्यर्थ हे आता रे बहु जिवलग गमते चित्ता रे
तुज सरित्पते जी सरिता रे त्वदविरहाची शपथ घालितो तुजला ॥
सागरा प्राण तळमळला
या फेनमिषें हससि निर्दया कैसा का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते भिनि का आंग्लभूमीते
मन्मातेला अबला म्हणुनि फसवीसी मज विवासनाते देशी
तरि आंग्लभूमी भयभीता रे अबला न माझि ही माता रे
कथिल हे अगस्तिस आता रे जो आचमनी एक क्षणी तुज प्याला ॥
सागरा प्राण तळमळला
कळावे,
आपला ,
विनायक दामोदर सावरकर